*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सामाजिक कार्यकर्त्या कल्पना काटकर यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमी तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड २०२५ देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. दिं १४ मे रोजी शिवाजीनगर पुणे येथे पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात झालेल्या समारंभात हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र म ोदी यांचे अध्यात्मिक गुरु मा. श्री श्री श्री १००८ आंतरराष्ट्रीय महामंडलेश्वर परमहंस कृष्णानंद कालिदास बाबाजी (हरियाणा) यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी
भूमाता ब्रिगेड च्या संस्थापिका तृप्ती देसाई, देवमाणूस फेम मंगली आत्या (पुष्पा चौधरी), संस्थेचे अध्यक्ष डॉ अविनाश सकुंडे व सरचिटणीस गणेश विटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. श्रीमती कल्पना काटकर या राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा
आहेत. त्यांनी महिला सबलीकरण च्या माध्यमातून पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व अहिल्या नगर यासह राज्यभरातील अनेक पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणून त्यांना शासनातर्फे गौरविण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा