Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० जून, २०२५

बावडा येथील कु भाग्यश्री अंकुश घाडगे यांनी रांगोळीतून श्रीसंत नारायण महाराज देहूकर समवेत विठू माझा लेकुरवाळा भक्ती मेळ्याची आकर्षक प्रतिकृती साकारली

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

----- संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनाचे निमित्त साधत बावडा येथील कु. भाग्यश्री अंकुश घाडगे हिने रांगोळीतून पालखी सोहळ्याचे जनक श्रीसंत नारायण महाराज देहूकर समवेत विठू माझा लेकुरवाळा भक्ती मेळ्याचे अप्रतिम प्रतिकृती हुबेहूब साकारली. संस्थानच्या विश्वस्थांनी रांगोळीला भेट देवून त्याची पाहणी केली.

     जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उमेश महाराज मोरे, विक्रम महाराज मोरे, मुकेश महाराज मोरे, रामदादा मोरे तसेच संत तुकाराम महाराज पालखी बैल जोडीचे मानकरी २०२३, भानुदास शेठ खांदवे, २०१७ बैल जोडीचे मानकरी युवा नेते खिल्लार बैल प्रेमी प्रशांत शेडगे, गौरव साखरे, रवी काळभोर, शामराव बाबर यांनी भाग्यश्री घाडगे यांच्या रांगोळीला भेट देऊन त्याचे कौतुक करून सत्कार केला.

    यावेळी बावडा येथील घाडगे परिवाराच्या वतीने महादेवराव घाडगे (संचालक सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना अकलूज) यांनी मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी शंकर घाडगे, अंकुश घाडगे, रणजित घाडगे, अभिजित घाडगे आदि उपस्थित होते. 




फोटो - बावडा येथील कु भाग्यश्री अंकुश घाडगे यांनी रांगोळीतून श्रीसंत नारायण महाराज देहूकर समवेत विठू माझा लेकुरवाळा भक्ती मेळ्याची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा