Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० जून, २०२५

विट्ठल विट्ठल जय हरी विट्ठल च्या जयघोषात फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांचा दिंडी पालखी सोहळा

 


अकलूज प्रतिनिधी 
कादरभाई शेख

संत येती घरा तोची दिवाळी दसरा..! असे म्हटले जाते पण आषाढ महिन्यात संतांच्या दिंडी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होत असतात.त्यामुळे या मार्गातील गावागावात पालखीचे आगमन होत असल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरणात पसरलेले असते. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील २५/४ लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .या प्रसंगी पालखीचे पूजन उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आले.




लहान मुलांनी विविध संतांचे वेशभूषा परिधान करून दिंडी पालखी सोहळ्यात चिमुकली मुले भक्तीभावाने कपाळी टिळा व टाळ हाती घेवून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जयघोष करीत सहभागी झाली होती. या प्रसंगी बोलताना शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की आपली भारतीय संस्कृतीची ओळख व संतांची शिकवण लहान वया पासूनच बाल मनावर बिंबवले गेले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा