*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या चांगलंच गाजलंय... सासर कडून झालेल्या छळाला कंटाळून पोटच्या लेकराचा विचार न करता या विवाहितेने आत्महत्येला जवळ केलं... लग्नामध्ये लाखोंची फॉर्च्युनर भेट देऊन सुद्धा माहेर कडून आणखी पैशाचा तगादा लावल्यामुळे, आणि सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी ने हे पाऊल उचलले ही मनाला चटका लावणारी बातमी महाराष्ट्रने पाहिली... हगवणे यांच्या क्रूरकर्माचा महाराष्ट्रभर निषेध नोंदविला गेला. मात्र लग्न वेळी वैष्णवीच्या कुटुंबाकडून घेतलेली फॉर्च्युनर केंद्रबिंदू ठरली असून हगवणे सारख्या नीच कुटुंबामुळे फॉर्च्यूनर बदनाम झाली असल्याचे सांगून अतुल खूपसे यांनी वैष्णवी हगवणे हिला श्रद्धांजली अर्पण करून तिच्या मारेकर्यांना कडक शासन झाले पाहिजे अशी मागणी केली.
खरंतर लग्न म्हटलं तर हुंडा, मानपान, करणी धरणी हे सगळं आलंच. पुढच्या मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी वधू पिता अनेक अडचणींच्या डोंगराला सामोरं जाऊन हौस करतो. याच पद्धतीने वैष्णवी चा संसार सुखाचा व्हावा, सासर मोठ मिळालं आहे म्हणून कोट्यवधी रुपये खर्चून लग्न केले. लग्नामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फॉर्च्युनर गाडीची चावी हगवणे कुटुंबाकडे सुपूर्द केली. मात्र त्यानंतरही पैशासाठी व इतर कारणासाठी वैष्णवी चा छळ होऊ लागल्याने वैष्णवी ने आत्महत्या केली असल्याचे महाराष्ट्राने पाहिले.
प्रामुख्याने या घटनाक्रम मध्ये फॉर्च्युनर ही गाडी प्रचंड बदनाम झाली. समाज माध्यमावर फॉर्च्यूनर या गाडीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. फॉर्च्युनर गाडी असणाऱ्या लोकांना त्यांचे मित्र मंडळी टिंगल टवाळी करू लागले. नेते, गाडी तुम्ही घेतली आहे की सासऱ्याकडून भांडून घेतली...? ज्या पद्धतीने वैष्णवीला त्रास झाला, तसा त्रास वगैरे वहिनींना देत नाही ना...? अशी विचारणा होऊ लागली.
त्यामुळे जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष, शेतकरी चळवळीचे नेते अतुल खूपसे पाटील यांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीवर हगवणे कुटुंबीयाला टार्गेट करत वेगवेगळी वाक्य लिहिली आहेत. यामध्ये तशी तर मी मोठ्या घरची राणी- मात्र मला बदनाम केलं हगवणे यांनी... मी फोरचुनर माझा रुबाबच वेगळा, पण हगवणे यांच्यामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा.... अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय-पण हगवणे मुळे लोकांनी मला धु धु धुतलंय... अशा प्रकारची वाक्य गाडीवर टाकून त्यांनी हगवणे कुटुंबीयांचा बाजार उठविला असून सोशल मीडियावर गाडीचा हा फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
▪️ *चौकट*
*हगवणे कुटुंबीयांना कठोर शासन झालं पाहिजे*- *खरंतर मुलगी एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या घरी द्या. त्याला एखादी गाई म्हैस घेऊन द्या. तो तुमची आयुष्यभर जाणीव ठेवेल. मात्र मुलगी मोठ्या घरी जाते ही कल्पना मुळात चांगलीच. मात्र समाजातून टाकून दिलेल्या अवलादी त्यांना कितीही कमीच पडते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हगवणे कुटुंब. वैष्णवी ताई वर जो अन्याय झाला आहे, असा अन्याय माझ्या स्वतंत्र भारतातील एकाही मुलीवर पहिला नको. तिच्या मारेकऱ्यांना कठोर शासन झाले तरच तिला श्रद्धांजली ठरेल*
- *अतुल खूपसे पाटील*
*जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा