*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147
-----
युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्थेची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय अॅथलेटिक्स कबड्डी स्पर्धेत लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान या संस्थेतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत ३ रौप्य व ३ कांस्य पदकांची लयलूट केली.
नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील ४ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल तसेच विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
या कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे तसेच पालकांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, संस्थेच्या उपाध्यक्ष व सरपंच चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, संस्थेचे सल्लागार प्रदीप गुरव, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन स्कूल अॅड ज्युनिअर महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश पवार, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य सम्राट खेडकर यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडू (वयोगट, क्रीडा प्रकार, खेळाडूचे नाव व पदक यानुसार)
८ वर्षे मुलीः ५० मी./१०० मी. धावणे - स्वरा डोंगरे, रौप्य १० वर्षे मुलीः ५० मी. धावणे आराध्या खेडकर, रौप्य. १९ वर्षे मुले : भालाफेक - क्षितीज जगताप, कांस्य. १९ वर्षे मुले : ८०० मी. धावणे अंकित मोहिते, रौप्य. १७वर्षे मुले कबड्डी प्रतीक जाधव, कांस्य. १०० मी. धावणे ऋतुराज मासाळ, चतुर्थ क्रमांक लांब उडी : पृथ्वी धनवडे, चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा