Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २ जून, २०२५

*माणकी येथे अनोख्या पद्धतीने मुलीच्या जन्माचे स्वागत.*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

प्रत्येकाच्या घरात बाळ जन्माला येणं खूप आनंदाची गोष्ट असते. पूर्वीच्या काळी लोक फक्त मुलगा झाला तरच गावात पेढे वाटून आनंद साजरा करायचे.पण आता तो काळ राहिलेला नाही. प्रत्येक घरात आता मुलीच्या जन्माच्या स्वागतचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत आणि का करू नये ? मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी असते.तिच्या इवल्याश्या सोन पावलांनी येऊन ती घरदार समृध्द करते.मुलगी म्हणजे घरातील चैतन्याचा व उत्साहाचा झरा असतो.

        माणकी (ता.माळशिरस) येथील अमोल रणनवरे व सौ.सविता रणनवरे यांना कन्यारत्न झाले. काल शंकरराव अनंतराव रणनवरे (सर) त्यांच्या नातीचे आणि डॉ.शिरीष शंकरराव रणनवरे यांच्या पुतणीचे घरामध्ये मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात स्वागत करण्यात आले.हालगीचा कडकडाट, फटाक्यांच्या आतिषबाजी आणि फुलांच्या पायघड्या घालून सुवासिनीनी औक्षण करून उंब-यावर ठेवलेल्या कुंकवाच्या पहिल्या पावलाची खूण पांढ-या वस्त्रात उमटवून मुलीला घरात घेण्यात आले.अशा आनंदी वातावरणात रणनवरे कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक यांच्या उपस्थितीत मुलीचे घरी आल्यानंतर भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.




            पुर्वीच्या काळी मुलगा झाला आहे म्हणाले की,वंशाला दिवा झाला म्हणून संपुर्ण घर आनंदीत होत होते पण आज समाजात मुलींच्या जन्माची संख्या घटत आहे.त्यामुळे आता मुलगी झाली ओ म्हणाले तरी त्या घरात आनंदी वातावरण होत असल्याचे माळशिरस तालुक्यात पहायला मिळत आहे.याचे जिवंत उदाहरण काल माणकी येथे दिसू आले.


*चौकट*

*आजकाल मुली कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. हवाई दलात पायलट होऊन विमान चालवत आहेत.काही डॉक्टर होऊन वैद्यकीय क्षेत्र संभाळत आहेत,तर काही अभियांत्रिकी पदवीधर होऊन मोठ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. एक स्त्री नोकरी करत करत घर सांभाळते सगळी नाती जपते त्यामुळे ती पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने जास्त काम करते.त्यामुळे घरी मुलगी जन्माला येणे हे भाग्यवान असल्याचं लक्षण आहे*


  *डॉ.ज्योती रणनवरे*

शंकरनगर ता.माळशिरस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा