*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- विठुरायाच्या चरणांचे दर्शन होण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. भक्तांच्या ओठांवर विठ्ठल! विठ्ठल! चा निनाद अनावर झाला आहे. भेटीची उत्कंठा प्रचंड वाढली आहे.
"तुका म्हणे धावा !
पंढरी विसावा !!
नाही आस उरली !
आहे पंढरी विसावा !!"
असे म्हणत वारकरी देहभान विसरून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने निघाला आहे.
जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील दहा दिवसांच्या प्रवासानंतर सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे. दोनच दिवसात पंढरपूर नगरीत पोहचणार आहे. त्यावेळसच पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने आतुर होवून निघाल्याचे योग्य वेळी योग्य छायाचित्र प्रसिद्ध फोटोग्राफर सुरज बोरगावकर यांनी टिपले आहे.
जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामी सराटीकडे आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाने निघाला असताना तोंडी विठ्ठल! विठ्ठल! नामजप करत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने देहभान विसरून चालत निघाला असतानाच्या वेळी प्रसिद्ध फोटोग्राफर सुरज बोरगावकर यांनी छायाचित्र टिपले आहे.
फोटो - सराटी कडे जाताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे छायाचित्र फोटोग्राफर सुरज बोरगावकर यांनी टिपले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा