अकलूज ---प्रतिनिधी
शकुरभाई तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज (ता. माळशिरस) : येथील सदाशिवराव माने विद्यालयात दि. २९ ऑगस्ट रोजी क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक .अमोल फुले सर यांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. याप्रसंगी उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, सर्व क्रीडा शिक्षक, खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयातील क्रीडा शिक्षक उमेश भिंगे,भीमराव दुधाळ, संजय राऊत व गुणवंत खेळाडूंचा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना क्रीडा शिक्षक संजय राऊत यांनी क्रीडा दिनविषयी साजरा करण्याचा उद्देश, महत्व, सांगून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे क्रीडास्पर्धेतील योगदान त्यांची यशस्वी कारकीर्द याची माहिती सांगितली. तसेच ग्रामीण भागातील खेळ लोप पावत चालले असून मुलांनी मोबाईलच्या मोहजालात न अडकता विविध खेळ प्रकारात सहभाग घ्यावा. ग्रामीण भागातील लुप्त होत चाललेल्या खेळास प्रोत्साहन मिळण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक संचालक मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी आट्यापाट्या, लगोर, गोट्या, विट्टी दांडू इ. या खेळास शाळेत खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक शैलेश माने यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर,विद्यालयाचे खेळाडू, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा