*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारंभ समिती अकलूज च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले
श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज जयंती समारंभ समिती, अकलूज यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
शुक्रवार दि01/08/2025 रोजी सायं.6.00 वाजता श्री लक्ष्मी बालाजी हॉल, बायपास रोड, अकलूज येथे संपन्न झाली.
या सोहळ्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनकार्याला आदरांजली वाहणे, त्यांच्या क्रांतीकारी विचारांचा प्रचार-प्रसार करणे आणि समाजात नवचैतन्य निर्माण करणे होय
या प्रसंगी डॉ. दिलीप गुजर, अशोक कांबळे, तानाजीराव पांडव, अशोक शिंदे, बंडू खडतरे, अशोक राजगुरू, प्रा. नितीन लोखंडे, राजाराम गुजर, गोपाळ मस्तूद, सौरभ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि समाजबांधव उपस्थिती होते
कार्यक्रमाच्या यशस्वी पणे पार पाडण्यासाठी आयोजक व संयोजकांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा