Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

*अकलूज येथे" शिवरत्न" च्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त नोकरी मेळाव्याचे आयोजन*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

अकलूज येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, "ऍक्सीस बँक नोकरी मेळावा २०२५" चे १२ ऑगस्ट रोजी शिवरत्न नॉलेज सिटी शंकरनगर-अकलूज येथे करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.


या मेळाव्याच्या माध्यमातून बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह आणि सेल्स ऑफिसर या पदांसाठी तरुणांना संधी मिळणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना या संधीसाठी अर्ज करता येणार आहे उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट च्या आधारे करण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी उमेदवारांनी अद्ययावत रेझ्युमे, १०वी, १२ वी व पदवीच्या मार्कशीट्सच्या ३ झेरॉक्स प्रती, ओळखपत्रे (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स) आणि 

पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन यावे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास निवड प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो, याची नोंद घेणे आवश्यक आहे. हा उपक्रम शिवरत्न इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरराव मोहिते महाविद्यालय, ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅण्ड टेक्नॉलॉजी, विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्युटआणि ऍक्सीस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा