Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

दिव्यांग व वयोश्री योजनेतील लाभार्थीसाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन इंदापूर व अंथुर्णे येथे ३० व ३१ ऑगस्ट रोजी करण्यात आले असून भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) व कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान इंदापूर यांच्या वतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

----- दिव्यांग व वयोश्री योजनेतील लाभार्थीसाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन इंदापूर व अंथुर्णे येथे ३० व ३१ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) व कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान इंदापूर यांच्या वतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये राष्ट्रीय वयोश्री अंतर्गत तपासणी ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० व ६० वर्षावरील) ठेवण्यात आली आहे.

     यासाठी आवश्यक कागदपत्रे (झेरॉक्स)

आधार कार्ड, पासपोर्ट साईज २ फोटो, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड उत्पन्न दर्शविणारे. (वार्षिक 180000/-च्या आत) (पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, किंवा ग्रामसेवक / सरपंच दाखला) आवश्यक आहे.

     राष्ट्रीय वयोश्री अंतर्गत मिळणारे साहित्य

व्हीलचेअर, व्हीलचेअर विथ कमोड, काठ्या, कानाची मशीन, कंबरेचे, गुडघ्याचे पाठीचे आणि गळ्याचे पट्टे, बसण्याची गादी, कमोड चेअर शील.

     दिव्यांग व्यक्तींसाठी तपासणीत (दिव्यांग प्रकार आणि साहित्य आणि अपंग टक्केवारी खालीलप्रमाणे) आवश्यक कागदपत्रे (झेरॉक्स) UDID कार्ड (आवश्यक) आणि दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्न दाखला / रेशन कार्ड उत्पन्न दर्शविणारे.. (वार्षिक 270000/- रु च्या आत) (पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड किंवा ग्रामसेवक सरपंच दाखला) आवश्यक आहे.


     अस्थी व्यंग - तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, काठी, कुबडी, कृत्रिम अवयव (हात-पाय), सी.पी. चेअर किमान ४०% आणि वर दिव्यांग प्रमाणपत्र कर्णबधिर कानाची मशीन. अंध प्रवर्ग (१००%) - प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ब्रेल किट, अंध काठी. इयत्ता १० पासून पुढे शिकत असल्यास स्मार्ट फोन आणि सुगम्य केन (सेन्सर अंध काठी)-(शाळेत शिकत असल्याचा पुरावा शाळेचे / कॉलेजचे ओळखपत्र किंवा बोनाफाईड आवश्यक)

         -आवश्यक सुचना-

१) बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकलसाठी किमान ८०% दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक

(बहिरा, अंध, मतिमंद नसावा आणि दोन्ही हाथ सुस्थितीत असावे),

२) मागील ३ वर्षात कुठलाही साहित्य लाभ घेतलेला नसावा.

३) बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल आणि स्मार्टफोनसाठी मागील ५ वर्षांत लाभ घेतलेला नसावा.

   शनिवार दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वेळेत इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन, तसेच रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ अंथुर्णे येथील अतिथी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) व कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान इंदापूर यांच्या वतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा