उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 हा कार्यक्रम स्वेरी कॉलेज पंढरपूर तालुका पंढरपूर या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जगताप साहेब होते तसेच प्राचार्य. रोंगे सर, उपप्राचार्य श्रीम. पवार मॅडम पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते राज्यातील विविध भागातील एकूण 55 आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात श्री .तांबोळी जे .एम ’सहशिक्षक’ महाराष्ट्र विद्यालय बार्शी व श्रीम. सफूरा रफिक आतार सहशिक्षिका आदर्श विद्यालय रातंजन तालुका बार्शी या उभयंत्यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते ’आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .या सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षक व त्यांच्या शाळेचा स्टाफ, मित्र, पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन तालुकाप्रमुख श्री लेंडवे सर यांनी केले कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन श्री बागमारू सर शेख सर तसेच राज्य प्रमुख रणशूर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पडला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा