*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले आणि युवकांमध्ये लोकप्रिय असलेले राहुल राजाभाऊ भालेकर यांनी आज अधिकृतरित्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना उपनेते मा. ज्ञानराज चौगुले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी ज्ञानराज चौगुले साहेब यांनी राहुल भालेकर यांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. “तळागाळातील लोकांसाठी झटणारे कार्यकर्ते शिवसेनेची खरी ताकद आहेत. राहुल भालेकर यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद निश्चितच वाढेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
राहुल राजाभाऊ भालेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. पक्षप्रमुखांचे विचार आणि ज्ञानराज चौगुले साहेबांचे नेतृत्व पाहून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पुढील काळात पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य अधिक जोमाने करणार आहे.”
-----: जाहिरात:----👇
या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षप्रवेशामुळे परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा