Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

**मागील पाच वर्षातील भ्रष्टाचाराची पोलखोल करणारा पेनड्राईव्ह पाटील गटाच्या हाती, सूनील तळेकर यांचा खळबळजनक दावा ...*

 *करमाळा प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


मागील पाच वर्षातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करणारे पेन ड्राईव्ह भरुन उरतील इतके काही पुरावे पाटील गटाच्या हाती आले असल्याचा खळबळजनक खुलासा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला. पेनड्राईव वरुन तालूक्यात एका मोठ्या चर्चेला तोंड फोडले आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार संजयमामा शिंदे हे सध्या त्यांच्या कालावधीत खर्ची केलेल्या आमदार फंडातील तसेच इतर मंजुर कामांची उद्घाटने, भुमिपुजन करुन शीळ्या कढीला उत आणत असुन पाच वर्षाच्या कालावधीत त्यांना  हक्काच्या अशा आमदार फंडातील मंजूर कामांची वा इतर कामांची साधी प्रशासकीय मंजूरी सुध्दा वेळेवर मिळवता आली नाही हे अपयश स्वतःहून जगाला दाखवत आहेत. किंबहुना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्यानेच त्यांनी स्टंटबाजी सुरु केली आहे. वास्तविक पाहता आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतलेल्या आमसभेत अनेक नागरिकांनी आपले मागील पाच वर्षे रखडलेले प्रश्न मांडले. परंतू 



वेळेत मांडू न शकलेले अनेक प्रश्न व तक्रारी लोक अजूनही देत आहेत.तसेच आमसभेत मांडलेले मागील पाच वर्षांपासून रखडलेले अनेक प्रश्न अजूनही काही विभागाकडून रेंगाळत ठेवले जात असल्याचे सांगून 



नागरिकांनी एका विशेष आमसभेची मागणीही केली आहे अशातच विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी महावितरणच्या कामांचा आढावा घेतला. तसेच आपण सर्वच विभागांची बैठक घेणार असल्याचे सांगितले. यानंतर मात्र आता आमदार पाटील यांच्या कार्यालयात अनेक नागरिकांनी कृषी, आरोग्य, महसूल, सार्वजनिक बांधकाम,भुमापन, सहायक निबंधक, पंचायत समिती, पाणीपुरवठा, पुनर्वसन आदिसह सर्वच शासकीय कार्यालयात मागील पाच वर्षांपासून आपली कामे झाली नसल्याच्या लेखी तक्रारी द्यायला सुरुवात केली आहे. विशेषतः पुनर्वसन विभागातील आमदार नारायण आबा पाटील यांनी सन २०१४ ते सन २०१९ मध्ये मोठ्या महत्प्रयासाने मंजुर करुन आणलेली कामे सन २०१९ ते सन २०२४ या मागील पाच वर्षात रखडली गेली. तसेच कामे पुर्ण करुन घेताना आपणास ठेकेदार व राजकीय कार्यकर्ते यांनी खुप त्रास दिल्याबद्दल तक्रारी 

                              ***"*जाहिरात*****👇



कार्यकर्त्यांनी सांगितल्या .तसेच यासंबंधी काहींनी मागील‌ रेकॉर्ड केलेले कॉलही ऐकवले. तर अनेक नागरिकांनी आपणास मागील पाच वर्षात काम करुन घेताना चिरीमिरी मागितल्याचे  सांगितले आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. एकंदरीतच मागील पाच वर्षाच्या काळातील कारभाराची पोलखोल करणारा पेन ड्राईव्हच पाटील गटाच्या हाती लागला आहे. वास्तविक अनेकांनी लेखी तक्रारी दिल्या आहेत तर काहींनी यासंबंधी कॉल ऐकवले आहेत. यामुळे अर्ज व‌ कॉलची सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे व नंतरच याबाबत पुढील पाऊल उचलले जाणार असल्याचे तळेकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा