संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
ईद-ए-मिलादुन्नबीच्या पावन दिनानिमित्त धाराशिव (उस्मानाबाद) शहरात एसीएम (ACM) ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल 236 रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
एसीएम ग्रुपकडून दरवर्षी ईद-ए-मिलाद निमित्त विशेष सामाजिक उपक्रम राबवला जातो. सलग तेराव्या वर्षी हे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले असून, शहरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रक्तदान करणाऱ्या नागरिकांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अझहर मुजवार, जफर शेख, सादिक पठाण, सादिक मुजवार, पोपट करवर, ईल्यास मुजवार, इम्रान मुजवार, शाफेज शेख, जमीर शेख, रियाज शेख, सय्यद खाजा, मजीद सय्यद, ओवेज शेख, असेम हुसेनी, मुन्ना नाईकवाडी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
एसीएम ग्रुपच्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत असून, समाजहितासाठी युवकांनी पुढाकार घेऊन दाखवलेल्या या प्रयत्नाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा