Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५

धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली बेंबळी येथील अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

बेंबळी तालुका धाराशिव येथे अतिवृष्टीग्रस्त भागाला शिवसेना खासदार ओमदादा राजेनिंबाळकर साहेब यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी केली. सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या पाहणीदरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना खासदार ओमदादा यांनी स्पष्ट सूचना दिल्या की

  शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत.

 शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी.



  शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

शेतकरी हे आपल्या राष्ट्राचे कणखर आधारस्तंभ आहेत. त्यांच्या घामाने सिंचन झालेल्या मातीतूनच महाराष्ट्राची भाकरी तयार होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने तात्काळ उभे राहून मदतीचे हात पुढे करणे ही काळाची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा