संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
लासुर्णे गावामध्ये जागतिक लोकशाही दिनाचे निमित्त साधुन लासुर्णे ग्रामपंचायत व साद फाउंडेशन, इंदापूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ ते १७ सप्टेंबर २०२५ रोजी तीन दिवसीय ग्रामस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना लासुर्णे गावचे सरपंच सागर पाटील यांनी सांगितले की, मसाला उद्योग हा महिलांचा आर्थिक स्थिती मजबूत करणारा व्यवसाय आहे. त्यामुळे मसाला निर्मिती उद्योग हा लासुर्णे गावाचा ग्राम उद्योग व्हावा. यासाठी लागणाऱ्या पल्वलायझर मशीन व ग्राइंडर मशीन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील.
यावेळी लासुर्णे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक स्वप्नील गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या सौ. मनीषा अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष (पिपा) लोंढे, ग्रामपंचायत सदस्या सौ. सोनम दिपक लोंढे, अनिल पाटील, दिपक लोंढे, विठ्ठल पाटील, महादेव रूपनवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुका सरचिटणीस क्षितीज वनसाळे, महेश रूपनवर उपस्थित होते.
तीन दिवस चाललेल्या या शिबिराला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिबीराच्या ठिकाणी महिलांकडून कच्च्या मसाल्यांपासुन वेगवेगळ्या प्रकारचे तयार मसाले कसे बनवायचे यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतले. लागणाऱ्या मशनरी, मार्केटिंग, शासकीय योजना यांची माहिती व या व्यवसायाच्या निगडित सर्व माहिती महिलांना या शिबिरात देण्यात आली.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी साद फाऊंडेशन चे अध्यक्ष सुरज वनसाळे, संस्थेच्या प्रशिक्षण संचालक भाग्यश्री ठाकुरदास व आशा निमसे, संस्थेचे आप्पासो कदम, कोमल वनसाळे, हर्षल वाघमारे, वैभव निंबाळकर यांनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा