Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ६ मे, २०२६

इंदापूरनगरीत घुमणार विठूनामाचा गजर! ‘अबब! विठोबा बोलू लागला...’ इंदापूरकरांना नाटकाची रंगतदार मेजवानी

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159



कर्टन रेझर एंटरटेनमेंट प्रस्तुत, नीलकंठ नांदुरकर लिखित  प्रशांत गिरकर यांचे दिग्दर्शन आणि नमिता वागळे - गिरकर यांची निर्मिती तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता nप्रभाकर मोरे यांचा प्रमुख अभिनय असलेले ‘अबब! विठोबा बोलू लागला...’ हे नाटक आता इंदापूरकरांच्या भेटीला येत आहे.  या नाटकाचा विशेष प्रयोग १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता डॉ. कदम गुरुकुल ऑडिटोरियम येथे रंगणार असून, इंदापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
हे नाटक केवळ पौराणिक किंवा धार्मिक कथेवर आधारित नसून, आजच्या धावपळीच्या युगातील सामाजिक वास्तवावर मिश्किलपणे भाष्य करते. " जर साक्षात विठ्ठल आपल्यासमोर आला आणि तो बोलू लागला तर?" या कल्पनेभोवती नाटकाचे कथानक गुंफले आहे. नाटकात विनोदाची खुसखुशीत फोडणी, भावूक प्रसंग आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरत आहे.
या भव्य नाट्य प्रयोगासाठी प्रायोजक म्हणून नामांकित सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ तर  सह - प्रायोजक म्हणून 'सागर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल', ओंकार मोबाईल, चेतना फार्मसी कॉलेज यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कलेला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळवून देण्याच्या उद्देशाने या प्रयोगाचे आयोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले आहे.
सध्या उन्हाळी सुट्ट्यांचे वातावरण असल्याने लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आनंद देणारा हा कौटुंबिक प्रयोग पथदर्शी ठरणार आहे. कसदार अभिनय, उत्कृष्ट संगीत आणि प्रभावी नेपथ्य ही या नाटकाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. इंदापूर शहर व तालुक्यातील नाट्यप्रेम आणि विठ्ठल भक्तांनी या प्रयोगाचा लाभ घ्यावा. आपल्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून विठूरायाचा हा ‘बोलका’ अनुभव घेण्यासाठी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे कर्टन रेझर एंटरटेनमेंटने केले आहे.
नाटकाच्या तिकिटां साठी रसिक प्रेक्षकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
​दीपक खिलारे: ९८९०१५७००२
​रुपेश सोनवणे. ९९७५३१२२६३
​सचिन आरडे. ९९७५८३८१६६
​भाग्यवंत आरडे. ९७६६९३०२७१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा