Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

पाणीच पाणी


 

पाणीच पाणी


संकट हे कसलं आस्मानी

रानात पाणी डोळ्यात पाणी

काळजाचं झालं पाणी पाणी !


पिकासह माती गेली वाहून

कापणीला आलेली पिकं अंकुरली अन् गेली नासून !


जीवघेणा ओला हा दुष्काळ

नासाडी केली धन धान्याची

शेतकऱ्यांसाठी झाला काळ !


कसे पावसाने मांडले थैमान

संकटाने या कोसळला बळीराजा                            

धोक्यात आहेत त्याचे प्राण !


झाले आता कठीण जगणं

तुटपुंजी मदत नको कोरा करा सातबारा हेच त्याचं मागणं !!




नूरजहाँ फकृद्दिन शेख

गणेशगाव ता. माळशिरस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा