Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सकाळी दहा वाजता मतदानास प्रारंभ-- सोलापूरच्या-- खासदार प्रणिती शिंदे आणि माढाचे खासदार-- धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले मतदान


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

नवी दिल्ली, दिनांक, ०९ सप्टेंबर २०२५


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप-एनडीए सरकारचा दबावामुळे तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीचे कारण सांगत राजीनामा दिला होता. 


धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या १५ व्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. इंडिया आघाडीकडून या पदासाठी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत.


संसदेतील लोकप्रतिनिधींनी मतदानास सुरुवात केली असून सोलापूरच्या खासदार- प्रणिती शिंदे आणि माढ्याचे खासदार- धैर्यशील मोहिते पाटील यांनीही आज सकाळी मतदान केले. 


मतदान प्रक्रिया सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.०० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून निकालही आजच्याच दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे.


उपराष्ट्रपती पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने पार पडते आणि यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा आदेश (व्हिप) लागू नसतो. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा