Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

पुणे येथील "सिरत कमिटीचा" अभिनव उपक्रम-- डीजे विरहित पैगंबर जयंती ची मिरवणूक --सर्वत्र स्वागत


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

पुणे : सिरत कमिटीच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही हजरत महंमद पैगंबर यांची जयंती पुणे शहरामध्ये डीजे विरहीत मिरवणूक काढून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यंदाची वर्ष हे दीड हजारावे जयंती वर्ष असल्यामुळे यावर्षी अधिक उत्साहाने आणि धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


सिरत कमिटीच्या वतीने आयोजित मुख्य मिरवणुकीची सुरुवात नाना पेठेतील मन्नूशाह मशिदीपासून झाली. सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, मौलाना ज़मीरुद्दिन, मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन, मौलाना खालिद निजामी, मौलाना गुलाम अहमद खान, रफीउद्दिन शेख, माजी आमदार मोहन जोशी, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे राहुल डंबाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, सिराज बागवान, जावेद खान, आबिद सय्यद, जावेद शेख, हाजी नजीर तांबोळी, आसिफ शेख, सूफियान कुरैशी या वेळी उपस्थित होते.


संत कबीर चौक, एडी कॅम्प चौक, भारत चित्रपटगृह, पदमजी पोलीस चौकी, निशांत चित्रपटगृह, भगवानदास चाळ, चुडामण तालीम चौक, मुक्तीफौज चौक, कुरेशी मशीद, जान महंमद रस्ता, बाबाजान चौक, चारबावडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, भोपळे चौक, पूलगेट चौक, महात्मा गांधी रस्ता, महंमद रफी चौक, कोहिनूर चौक, महावीर चौक, सरबतवाला चौक, क्वार्टर गेट चौक, संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अल्पना चित्रपटगृह, हमजेखान चौक, महाराणा प्रतापसिंह रस्ता, गोविंद हलवाई चौक, सुभानशहा दर्गा चौक या मार्गांनी मिरवणूक निघून शुक्रवार पेठेतील सिटी जामा चौक येथे समाप्त झाली. सर्व प्रमुख चौकांत विविध पक्ष, संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मिरवणुकीचे सावागत करण्यात आले. डीजे विरहीत मिरवणूक निघाल्याने नागरिकांनी विशेष कौतुक केले.


दरम्यान, पैगंबर जयंतीचे दीड हजारावे वर्ष लक्षात घेऊन सिरत कमिटीच्या वतीने शहरातील विविध भागात वर्षभर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सिरत कमिटीचे सिराज बागवान आणि जावेद शेख यांनी सांगितले.


पुण्यातील सिरत कमिटीचे पदाधिकारी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी करत सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैगंबर जयंती ही विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर साजरी करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. – रंजन कुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे पोलीस दल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा