Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

साप हाच शेतकऱ्यांचा खरा मित्र-- प्रा. धनंजय देशमुख


 

अकलूज--- प्रतिनिधी केदार लोहकरे

टाइम्स 45 न्यूज मराठी

साप शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त असून पर्यावरण साखळीत त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.असे सर्पमित्र प्रा.धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले.अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्य प्रसिद्धी सप्ताहांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती समारंभ व सर्प विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.जनार्दन परकाळे हे होते. 



        प्रा.देशमुख म्हणाले की,

 निसर्गामध्ये मानवाच्या दृष्टीने सापाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.कारण अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांची संख्या मर्यादित ठेवण्याचे महत्त्वाचे काम साप करीत असतात.प्रत्यक्षात फक्त चारच प्रकारचे साप हे विषारी असून आपल्याकडे आढळणारे पन्नासहून जास्त प्रकारचे साप हे बिनविषारी असतात.त्यामुळे मनुष्यांनी आपण साप मारू नये.यावेळी सर्पदंश झाल्यास कोणती खबरदारी घ्यायची,विषारी व बिनविषारी दंश कसा ओळखायचा याची माहिती दिली.याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना साप हाताळण्याचेही प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जनार्दन परकाळे यांनी आपल्या मनोगतातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा आढावा घेतला.

           या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.दत्तात्रय मगर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ.सज्जन पवार ,प्रा.स्मिता पाटील, डॉ.विजयकुमार शिंदे,प्रा.रोहित कुंभार,प्रा.विनायक माने,डॉ.रविराज माने,प्रा.विनायक सूर्यवंशी आदी मान्यवर व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा