सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
संपूर्ण महाराष्ट्रसह सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असल्याने जीवन विस्कळीत झाले आहे तर अनेक लोक बेघर झाले आहेत. अनेकांना आपले घर सोडून स्थलांतर करावे लागले आहे. अशा नाजूक आणि कठीण परिस्थितीत सोलापूर येथील वैष्णवी ग्रुपचे कार्यकारी संचालक इंजिनिअर युवराज चुंबळकर व वित्तीय संचालिका सौ. भाग्यश्री चुंबळकर यांच्या विशेष प्रयत्नातून दिनांक २४ सप्टेंबर रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गाव येथील सीना नदीला महापूर आल्याने सदर गावात वैष्णवी ग्रुपच्या वतीने २०० नागरिकांना अन्न वाटप करण्यात आले.
यावेळी साईलीला संस्थान ट्रस्टी खजिनदार, प्रकल्प संचालक वैष्णवी सोसायटी चेअरमन सेक्रेटरी लेखक गीतकार कविसागर, प्रा. राहुल बोळकोटे, रशीद शाब्दि, प्रमोद होमकर, नागेश जामगोंडे, करण लोंढे, महादेव मोरे, रितेश काळे, विजय कवडे, संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा