Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

शेतकरी बांधवांनी संततधार पावसाची पूर्वकल्पना व त्यानुसार नियोजन उपाय साठी महाविस्तार कृषी ॲप, दामिनी ॲप ,पर्जन्यमान सूचना गुगल सर्चइंजिन मधील हवामान अंदाजाची माहिती प्राप्त करून घ्यावी...


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

मंडल कृषी अधिकारी अकलूज अधिनस्त 36 गावे महसूल मंडळ अकलूज महसूल मंडल लवंग व महसूल मंडळ महाळुंग कार्यक्षेत्रात येतात .माहे जून ते 22 सप्टेंबर या कालावधीपर्यंत अकलूज महसुल मंडल मध्ये 388 .1 मिलि, लवंग महसुल मंडळ मध्ये 432. 6 मिलि व महाळूंग महसुल मंडळ मध्ये 366 . 7 मिलि पडल्याची नोंद झाली आहे .26 सप्टेंबर 2025 पर्यत तालुक्यात176.5 मिलि पर्जन्यमान नोंद झाली आहेव जून 2025 ते सप्टेंबर 2025 अखेर तालुक्यात427.4 मिलिपर्जन्यमान झाले आहे मंडळ कृषी अधिकारी अकलूज कार्यक्षेत्रातील महाळून महसूल मंडल मध्ये 165.6 मिली लवंग महसूल मंडल मध्ये 188.4 मिली व अकलूज महसुल मंडळ मध्ये १८८.८ मिली पर्जन्यमानाची नोंद झाली आहे व हवामान अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस सोलापूर जिल्हा पर्जन्य छायेत असून रेड अलर्ट दर्शविलेला आहे यामुळे शेतकरी बांधवांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी ही विनंती आहे .सतत एकसारखा सर्वदूर सर्वत्र पाऊस पडल्यामुळे साधनसामुग्री, शेततळे, पिक ,काढणी झालेले पिक , काढणीस तयार पिक , फळपिके भाजीपाला यांचे नुकसान होऊ नये म्हणून खालील प्रमाणे काळजी घेणेचे अहवान या मंडल कृषी अधिकारी अकलूज कार्यालयाने केले आहे .



१ -सततच्या पावसामुळे शेततळे तुडुंब भरले आहेत यामुळे शेततळेफुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता सायफन आधारे शेततळ्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे .

२ -उडीद मूग सूर्यफूल काढणीस आले असेल तर त्याची त्वरित काढणी करून उंचवट्यावर साठवणूक करावी जेणेकरून पाण्यामुळे पिकाचे नुकसान होणार नाही .

३ -डाळिंब पिकावरील प्रोटेक्शन पेपर काढून टाकावा जेणेकरून आद्रता वाढण्यास अटकाव येऊन बुरशीजन्य रोगापासून काढणी योग्य फळाचे नुकसान होणार नाही .

४ -शेतामध्ये अतिरिक्त साठलेले पाणी उताराच्या दिशेने काढून टाकण्यात यावे .

५ -पाऊस उघडल्यानंतर कांदा चाळीला झाकलेली आवरणे उघडी करून हवा खेळती राहण्यासाठी मदत करावी जेणेकरून आ र्द्रता वाढल्यामुळे कांदा सडण्यापासून रोखला जाईल . ६ -शेतातील विद्युत चलित यंत्रसामग्री यंत्रे मोटार चाप कटर इत्यादीचे हाताळणी काळजीपूर्वक रित्या करावी .

७ -ऊस लागण व केळी लागण शेतातील अतिरिक्त पाणी उत्तराच्या दिशेने काढून टाकावे अन्यथा केळीची रोपे व उसाची रोपे पिवळी पडून वाढ खुंटून मरण्याची शक्यता बळावते

8- खरीप हंगामात बाजरी तूर मका सोयाबीन या पिकाचा विमा उतरला असेल तर अतिवृष्टी मुळे पिकाचे नुकसान झाले असेल तर नजीकच्या सहाय्यक कृषि अधिकारी यांचेशी किंवा ‘विमा प्रतिनिधीशी संपर्क साधावा श्री पळसे7083697172

9 -द्राक्ष आणि डाळिंब पिकाचे संरक्षण करण्यासाठीअँटी हेलनेट चा वापर करावा !

१० -सोयाबीन ऊस केळी द्राक्ष इत्यादी पिके पाणी साठल्यामुळे पिवळी पडत आहेत तरी या पिकांमध्ये साठलेले अतिरिक्त पाणी नैसर्गिक उत्तराच्या दिशेने प्राधान्य क्रमाने काढून देण्यात यावेः

११ -डाळिंब पिकावर अच्छादन केलेले प्रोटेक्शन पेपर काढण्यात यावा जेणेकरून अतिरिक्त आद्रता तयार होणार नाही व यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळला जाईल .

१२ -केळी ऊस डाळिंब व इतर पिकांना की ठिबक सिंचन सुविधा उपलब्ध आहेत या पिकांना ठिबक सिंचन द्वारे दोन टक्के सल्फर चे द्रावण ठिबक सिंचनाद्वारे पाच मिनिटे सोडण्यात यावे जेणेकरून जमिनीत उष्णता निर्माण होऊन मुळालाही उष्णता पोहचल्या मुळे बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव रोखता येईल .

१३ -टोमॅटो भाजीपाला पीक अतिरिक्त पाणी ला अतिशय बळी पडणारे पीक असून करपा रोगापासून संरक्षण करण्यासाठी फवारणी करावी .14-द्राक्ष बागेमधील फळधारणा होणारे बड व फळ धरणीचे बड त्यांचे पाण्यापासून संरक्षण करण्याबाबत पॉवर पंपाच्या साह्याने हवेचा फवारा मारून घड बड मधील पाणी काढून टाकण्यात यावे .

शेतकरी बांधवांनी या सतत सतत धार एकसारखा पाऊस याची पूर्व कल्पना व त्यानुसार नियोजन व उपाय साठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे महाविस्तार कृषी ॲप व विज अतिवृष्टी चेतावणीसाठी दामिनी ॲप तसेच पुणे वेधशाळेचा अंदाज कृषी विभागाच्या पर्जन्यमान सूचना गुगल सर्च इंजिन मधील हवामान अंदाज व पाऊसमान याची माहिती प्राप्त करून त्यानुसार नियोजन करावे असे आव्हान मंडल कृषी अधिकारी अकलूज यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा