कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- पुणे परिसरातून येणारे पाणी कमी झाल्याने भिमा नदीचे पाणी कमी करून २० हजार क्युसेक्स करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशवाडी येथील पुल वाहतूकीसाठी खुला झाला आहे.
उजनी धरणातून काल सोडले जाणारे एक लाख २५ हजार क्युसेक्सच्या विसर्गामुळे पुरपरस्थिती निर्माण झाली होती. धरण शंभर टक्के भरले असून धरणात एकूण ११७ टिएमसी पाणीसाठा झाला आहे. तसेच उजनी धरण परिसरात व पुणे घाटमाथ्यावर होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात होते. त्यामुळे पुरनियंत्रणाच्या दृष्टीकोनातून मागील तीन महिन्यांपासून भिमा नदी पात्रात सततपणाने पाणी सोडले जात आहे.
भिमा नदीवरील गणेशवाडी गाराअकोले यांना जोडणारा पुल काल सहाव्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला होता. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांचे येणे जाणे बंद झाले होते. आज पहाटे साडेपाच वाजता नदीतील पाणी कमी करून ५० हजार क्युसेक्स करण्यात आले. त्यामुळे पुल वाहतूकीस खुला झाला आहे. त्याचबरोबर भांडगाव, टणू, नरसिंहपूर येथील बंधाऱ्यांवरील पाणी कमी झाले आहे.
उजनी धरण परिसरात जूनपासून आजपर्यंत ६९५ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. तर उजनी वरील सर्वच धरणे शंभर टक्के भरल्याने मागील दोन महिन्यांपासून सतत पणाने पाणी खाली सोडले जात आहे. धरण शंभर टक्के भरले असून धरणातून आतापर्यंत जवळपास २०० टिएमसीच्या जवळपास पाणी सोडून देण्यात आले आहे. तर नदी काठावरील इंदापूर व माढा तालुक्यातील गावातील शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
फोटो- भिमा नदीवरील गणेशवाडी गाराअकोले पूलावरील पाणी ओसरल्याने
वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा