सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
अन्नप्रक्रियेशी निगडित व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांकडे खाद्य परवाना असणे ही काळाची गरज आहे. पदार्थांची स्वच्छता व गुणवत्तेच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे. त्यामुळे या व्यवसायिकांनी कटाक्षाने खाद्य परवाना काढावा,असे आवाहन इंदापूर नगरपरिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुभाष ओहोळ यांनी केले.
इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या सूचनेनुसार, नगरपरिष सभागृहात मंगळवारी दि.३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत इंदापूर शहरातील पथविक्रेत्यांचा लोककल्याण मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री. ओहोळ बोलत होते.
या मेळाव्यात बँक ऑफ महाराष्ट्राचे शितल किसपोता, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या राजश्री जगदाळे यांनी या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांकडून पथविक्रेत्यांकडे पहिले कर्ज पंधरा हजार रुपये देण्यात येईल. त्यानंतर वीस, पंचवीस हजार रुपये व तिसऱ्या वेळेस पन्नास हजार रुपयाचे कर्ज देण्यात येते अशी माहिती दिली. बँकेच्या वतीने पथविक्रेत्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आपल्या व्यवसायासाठी बँकेच्या गूगल पे, फोन पे व इतर डिजिटल सेवांचा वापर कसा करायचा याची त्यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
फोटो ओळ : पथविक्रेत्यांच्या लोककल्याण मेळाव्यात बोलताना सुभाष ओहोळ.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा