Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

कवी,लेखक हरिश्चंद्र पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर .


 

उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

टेंभुर्णी येथील सुप्रसिध्द ग्रामीण कवी, लेखक हरिश्चंद्र पाटील यांना श्री. संत किसन महाराज सुडके आश्रम संतनगर, कांगोणी, ता. नेवासा येथील ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा २०२५ सालचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.

 साहित्य लेखनाच्या माध्यमातून ग्रामसंस्कृती आणि तळागाळातल्या कष्टकऱ्यांच्या जगण्यातील दुःख, वेदना मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हरिश्चंद्र पाटील यांनी आपल्या सकस साहित्य लेखनातून केले आहे. हुंदके मातीचे - काव्यसंग्रह तर संस्कारफुले, शिरवाळ, हंबर, ओवाळणी, खरा वारस हे कथासंग्रह अशी त्यांची सहा पुस्तकें प्रकाशित झाली आहेत, या पुस्तकांना आजपर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पाटील यांना त्यांच्या पुस्तकासह काव्य स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा, कथालेखन स्पर्धा इत्यादी मिळून एकूण ८० पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पाटील यांना सदरचा हा जीवन गौरव पुरस्कार मिळालेबद्दल लेखक, साहित्य प्रेमी व मित्र यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा