Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

भ्रष्टाचार हे समाजास लागलेली कीड असून भ्रष्टाचार निर्मूलन ही काळाची गरज आहे--- राष्ट्रीय उपाध्यक्ष ,"दिलीप नाना सोनवणे" यांचे प्रतिपादन


 

सहसंपादक --डॉ.संदेश शहा

 टाइम्स 45 न्यूज मराठी

 मो:-9922419159

देशात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला असून भ्रष्टाचार ही समाजास लागलेली किड आहे. भ्रष्टाचारा मुळे देशाच्या प्रगतीस हानी पोहोचत असून त्यामुळे भ्रष्टाचार

निर्मूलन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप नाना सोनवणे यांनी केले.

 इंदापूर तालुक्यातील

गंगावळण कळाशी रोड वरील दत्त मंदिर सभागृहात अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया एनजीओ आयोजित भ्रष्टाचार निर्मूलन या विषयावर परिसंवाद आणि जनजागृती मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक तसेच श्री दत्त मंदिर ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनावले यांची पुणे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप नाना सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. दिलीप सोनवणे पुढे म्हणाले, तुम्ही सर्व नागरिक हे देशाचे जबाबदार नागरिक असून भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कान, नाक व डोळे आहात. तुम्हाला जिथे भ्रष्टाचार होत आहे असे वाटते, तिथे तुम्ही आमच्या समितीकडे पुरावा कागदपत्रासह संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.





पुणे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नुतन अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनावले म्हणाले, संपूर्ण पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जाईल. त्यासाठी जिल्ह्यातील सेवाभावी, समाजसेवी, स्वयंसेवी संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार निर्मूलन जनचळवळ होण्यासाठी युवापिढीने सकारात्मक योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी व ॲग्री वर्तन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी तरंगवाडी चे संचालक खंडेराव सोनावले यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव, सर्व सुजाण नागरिक तसेच खेड, सोलापूर राजगुरुनगर, श्रीगोंदा सिद्धटेक, इंदापूर या ठिकाणावरून बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा