Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली येथे विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात.


 

उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

शालेय जीवनातील आणि लहानपणाची आठवण म्हणून माजी विद्यार्थी आपल्या शालेय जीवनाला उजाळा देण्यासाठी गेट-टुगेदर कार्यक्रम आयोजित करत असतात आणि हा गेट-टुगेदर चा कार्यक्रम म्हणजे एक जीवनातील आनंदाचा क्षण असतो त्या अनुषंगाने विजयसिंह मोहिते विद्यालय, वाघोली येथील सन 2006/07 च्या दहावीच्या बॅच च्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे निवृत्त मुख्याध्यापक नरुटे सर,तर प्रमुख उपस्थितीमध्ये भगत सर, देशमुख सर, मुलाणी सर, एकतपुरे सर,शेळके सर, मिले सर, दळवी सर,सरवदे सर, पाटोळे सर, माने सर,सय्यद मॅडम, लोखंडे मॅडम हे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक बाळासो मिसाळ, इरफान मुलाणी, सूर्यकांत पराडे, अशोक मिसाळ, सीमा मिसाळ, वनिता मिसाळ यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. 

या कार्यक्रमासाठी 65 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा