Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

महाळुंग- तोंडले बोंडले,पालखी मार्गावरती भीषण अपघात एक जागीच ठार तर एकजण जखमी*.. *हा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा?* *पंधरा दिवसात पाच अपघात आणि पाच जणांचा मृत्यू अनेक जखमी.


 

अकलूज ---प्रतिनिधी केदार लोहोकरे

टाइम्स 45 न्यूज मराठी

महाळुंग तोंडले बोंडले नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा

पंधरा दिवसात पाच अपघात पाच जणांचा मृत्यू अनेक जण जखमी 


संग्रामनगर दि.२६ (प्रतिनिधी)

महाळुंग (ता.माळशिरस) येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गा वरती रविवार सकाळी साडे अकराचे दरम्यान निळ्या रंगाची स्विफ्ट कार आणि हिरो होंडा टू व्हीलर MH 16 BQ 2670 यामध्ये भीषण अपघात झालेला आहे. यामध्ये लक्ष्मण अंबादास रणदिवे राहणार वेळापूर वय ४० वर्षे यांचा जागीच मृत्यू झालेला आहे.त्यांची मुलगी वैष्णवी लक्ष्मण रणदिवे पाठीमागे टू व्हीलर वरती बसलेली होती.ती देखील गंभीर जखमी झालेली आहे.तिला अकलूजच्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.हा अपघात एवढा प्रचंड होता की,यामध्ये हिरो गाडी चक्काचूर झालेली आहे.मृत लक्ष्मण रणदिवे टेंभुर्णीला कामासाठी चाललेले होते ते ट्रॅक्टर ड्रायव्हर होते.महाळुंग यमाईदेवी मंदिराच्या पाठीमागच्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरती हा भीषण अपघात घडला आहे.यामध्ये पंढरपूरहून निळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधील कुटुंब पंढरपूरहून पुण्याच्या दिशेने चालले होते.दुचाकीला धडक देणारी स्विफ्ट कार (क्रमांक MH 12 PN 6820) अपघाताच्या क्षणी एअरबॅग उघडल्याने कारमधील प्रवासी सुखरूप बचावले मात्र दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.स्विफ्ट चालकावरती अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं 715/2025 BNS कलम 281,106 (1), 125(A), 125(B), mvact 184,134(A) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




गेले पंधरा दिवसापासून याच नॅशनल हायवे वरती संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग येणे ९६५ जी वरती पाच अपघात झालेले आहेत आणि यामध्ये पाच जणांचा मृत्यू देखील झालेला आहे हे अपघात महाळुंग डांगेवस्ती ते माळखंबी ब्रिजच्या दरम्यान झालेले आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांवरती आणि कर्मचाऱ्यांवरती तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.अपुरी कामे, अनेक ठिकाणी अपघात ग्रस्त क्षेत्र असल्यामुळे अनेक जीव गेले असताना कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी दखल घेतलेली नाही किंवा उपाययोजना केलेल्या नाहीत अशा तीव्र प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना दिल्या.





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा