विशेष प्रतिनिधी--एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9096837451
सोलापूर येथे,फोटोग्राफर वेल्फर असोसिएशन ऑफ सोलापूर च्या वतीने भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, मॅचेसचे तिसरे वर्ष आहे.या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा विजेता म्हणून अकलूज शहर व परिसर संघ यांचा,आक्रमक 11 अकलूज या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.छान काय भन्नाट कामगिरी केलीत! 130 किलोमीटर अंतर कापून सलग चार मॅचेस खेळून चारी मॅच जिंकून त्यात सर्वात मोठे यश मिळवले आणि शेवटी सेमी फायनल व फायनल जिंकून ट्रॉफी आपल्या नावावर केली.शिवाय 6 मॅन ऑफ मॅच च्या ट्रॉफी पण मिळवल्या ही मेहनत, संघर्ष आणि चिकाटीचं प्रतिक आहे. आपल्या संघाने दाखवलेला संयम, एकतेने आणि खेळाच्या कौशल्यावर आधारित विजय खरचं प्रेरणादायक आहे. यश मिळवणं म्हणजे केवळ खेळातील विजय नसतो, तर त्यासाठी केलेली तयारी, समर्पण आणि धाडस हे सर्व एकत्रितपणे मोलाचे ठरते. आजच्या या विजयामुळे, आपल्या संघाला एक नवा आत्मविश्वास आणि नवा प्रेरणा मिळेल. भविष्यात अजून मोठ्या उपलब्ध्यांमध्ये तुमचं नाव झळकेल तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा देऊन पुढील मॅचेससाठी शुभकामना व्यक्त केली या स्पर्धेमधील
सर्व फोटोग्राफर खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा