उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी. संचलित एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी. यांच्या वतीने गुणवंत शिक्षक विद्यार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी येथे दिनांक 12/ 10/ 25 वार रविवार ठीक सकाळी दहा वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सोसायटीचे सभासद असणारे श्री. तांबोळी जाकीर महंमद सर व त्यांच्या सुविद्य पत्नी आदर्श शिक्षिका श्रीम.सफुरा जाकिर तांबोळी. यांची गुणवंत कन्या कु.मैफिशा तांबोळी हिची सन २०२४_२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये कै.भैय्यासाहेब घोरपडे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, माळवाडी. मसूर (कराड) या ठिकाणी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाली. तिच्या या यशाबद्दल सत्कार सोहळा दिमाखात पार पडला. तिच्या या यशाबद्दल संस्थेतील मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लोकव्याख्यानकार प्रा. विशाल गरड सर तसेच अध्यक्ष म्हणून मा. जयकुमार (बापू )शितोळे तसेच संस्थेचे अध्यक्ष सन्मा डॉ. बी. वाय. यादव साहेब तसेच सोसायटीचे चेअरमन श्री. उमेश पाटील व व्हाईस चेअरमन श्री नितीन मोहिते सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरेख नियोजन करण्यात आले होते व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा