कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
-----: कामधेनू सेवा परिवाराच्या वतीने विधवा भगिनी, आजी-माजी सैनिक, जवानांच्या पत्नी किंवा माता तसेच वीरमाता आणि वीरपत्नी यांच्यासाठी दीपावली भाऊबीज सोहळा सुरवड (ता. इंदापूर) येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि. १८) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे यांनी ही माहिती दिली. या सोहळ्याचे उद्घाटन वीरपत्नी विद्या माधव पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये खा. ओमराजे निंबाळकर यांना कामधेनू सेवा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सदरचा सोहळा ह.भ.प. विजयाताई कोकाटे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात मिष्ठान्न भोजन, साडीचोळी व बांगड्या, मुलांना कपडे तसेच येण्या-जाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, गेली १७ वर्षांपासून विधवा भगिनींच्या शेकडो मुला-मुलींची दहावीपर्यंतच्या शालेय खर्चाची जबाबदारी कामधेनू सेवा परिवार घेत आहे, अशी माहितीही डॉ. आसबे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा