सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
इंदापूर पंचायत समिती आरोग्य विभाग तसेच उपजिल्हा रुग्णालय आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यात रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, पुणे जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.
सिद्धार्थ नामपल्ली यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी ३४६५३ बालकांचे लसीकरण करण्यात आले. या अभियानाअंतर्गत
शून्य ते ५ वर्ष वयोगटा तील ३५४६२ लाभार्थी पैकी ३४६५३ लाभार्थीना पोलिओ डोस देण्यात आला. सरासरी ९७% लाभार्थीना पोलिओ डोस देण्यात आला.
यासाठी ३७८ बूथ वर ८७४ कर्मचारी व ७६ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती.
सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.
सदर मोहिमेतून राहीलेल्या बालकांना दिनांक १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे पोलिओ डोस देण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी सांगितले.
सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विस्तार अधिकारी संतोष बाबर, विठ्ठल घुले, आरोग्य सहाय्यक भिमाजी बंडगर, दिपक उत्तेकर, सर्व आरोग्य सेवक, वरिष्ठ सहाय्यक चंद्रशेखर गोंजारी यांनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा