कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- बारामती तालुक्यातील जळोची एमआयडीसी येथे झालेल्या खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि बारामती तालुका पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथे अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे पावणे नऊच्या सुमारास फिर्यादी जळोची येथील पानशॉपवर थांबले असताना आरोपी गणेश माने, प्रथमेश गवळी, विनोद जाधव व इतर चार अनोळखी इसम मोटारसायकलवर येऊन फिर्यादीला "तु गणेश वाघमोडे याच्यासोबत का फिरतोस? माझी माफी माग!” असे म्हणाले. यावेळी प्रथमेश गवळी याने "याला ठेवायचे नाही" असे म्हणत त्याच्याजवळील कोयत्याने फिर्यादीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी "आम्ही इथले भाई आहोत" असे म्हणत कोयता हवेत फिरवत घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. संदीपसिंह गिल्ल यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. अटक आरोपी जयेश माने याने बारामती शहरामध्ये साथीदारांसह गेल्या वर्षी खून केलेला आहे त्यात जेलमध्ये होता. आणि दीड महिन्यापूर्वी जेलमधून सुटलेला आहे.या दोन्ही बाजूच्या आरोपींचा जुलै २०२३ मध्येही वाद झाला होता. त्यावेळी जयेश माने याला मारहाण करण्यात आली होती. त्याच्या फिर्यादीवरून गणेश वाघमोडे, गौरव सूळ व इतरांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिताफिने कारवाई करून दोन आरोपींना अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्दशन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, सहा. फौजदार एस. जे. वाघ, पो. हवा. खारतोडे, पो. हवा. स्वप्नील अहिवळे, स्था. गु. शाखा पुणे ग्रामीण पो. शि. होळंबे, शकील शेख आदींनी केली आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा