लातूर--- प्रतिनिधी
अश्फाक. शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आज दिनांक १०/१०/२०२५ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड जा. क्र. राष्ट्रीय सेवा योजना /२०२५-२६/१७९ या पत्र संदर्भान्वये महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत संकलित करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. या रॅलीत एकूण ५७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाअंतर्गत एकूण २५०९२(पंचवीस हजार ब्यान्नव)/निधी संकलित करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा