लातूर--- प्रतिनिधी
अश्फाक. शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दि. 12 ऑक्टोबर 2025 ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ज्ञानतीर्थ युवक महोत्सव 2025 संपन्न झाला या युवक महोत्सवामध्ये भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाने विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले.
युवक महोत्सवात प्रशांत साळी, सुरज गुळवे, अनिकेत कांबळे, रजत भोळे, महेश पंगे, विभुते सर होटे अपर्णा, पांचाळ ज्ञानेश्वरी, शिंदे कोमल, शिंदे पायल,, केंगार पायल, वाघमारे निशा, कांबळे तेजस्विनी, वंगाले मैथिली आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन युवक महोत्सवातील मूक अभिनय, वकृत्व, सुगम गायन, मेहंदी, रांगोळी, लावणी, लोकनृत्य लोकनृत्य लोक नृत्य अशा विविध कलाप्रकारांचे उत्कृष्टपणे सादरीकरण केले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मानखेडकर बबीता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. राजेश तगडपल्लेवार, प्रा. माळवदकर मंगल, प्रा. जक्कलवाड मल्हारी आदींनी सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा