उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील लवंग ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत विजयकुमार पाटील यांना उत्कृष्ट ग्रामविकास आणि लोकाभिमुख कार्याच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल २६ ऑक्टोबर रोजी ‘ग्रामरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मंगेश चिवटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या मानाच्या पुरस्कारानिमित्त फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ फकृद्दिन शेख व राहतआली हायटेक नर्सरी चे चालक नौशाद कासीम शेख यांनी त्यांचा विशेष सत्कार करून अभिमान व्यक्त केला.पंचक्रोशीतील नागरिक त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत .
या वेळी प्रशांत पाटील यांनी ग्रामविकासासाठी सातत्याने सकारात्मक उपक्रम राबवण्याची व गावकऱ्यांच्या विश्वासाला योग्य न्याय देण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला रणजित चव्हाण , युवा उद्योजक नितीन वाघ ,राम बाळू शहाणे,सतीश भिलारे, फिनिक्स स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी व गावातील मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा