Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

धाराशिव जिल्हा युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या उपसचिव "मनीषा वाघमारे" जिल्हा परिषद निवडणूक लढवणार!

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*


कसबे तडवळे. तालुका जिल्हा धाराशिव.               युवासेना  उपसचिव महाराष्ट राज्य मनिषा वाघमारे धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेच्या उपसचिव म्हणून मनिषा वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्यात व राज्यात आणि देशात ओळख आहे.  धाराशिव जिल्ह्यात व राज्यात करोना संकट काळात व पूर परिस्थी काळात पूरग्रस्तांनाच्या मदतीला धावून जाऊन गोरगरीबा पर्यंत मोठया प्रमाणात मदत पोहचवली.     





          कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षित करून नोकर भरती मेळावा घेऊन जिल्ह्यातील व राज्यातील हजारो तरुण तरुणी यांना पुणे मुंबई येथे नोकरी मिळवून दिली. युवासेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात व राज्यात  खेडोपाडी युवकांचे संघटन वाढवण्याच काम केल आहे.      






  सुशिक्षित युवकांची व युवतीयांची मोठी फळी सोबत असून  सामाजिक बांधिलकी असलेल सुशिक्षित युवा नेतृत्व घडाव  या साठी  जि .प च्या निवडणुकीसाठी   सर्वसमान्य जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून सर्व सामान्य जनतेच्या  जनरेट्यामूळ पक्ष प्रमुख व लोकप्रतिनिधी नेते यांच्या मार्गदर्शनं धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक लढण्यांची तयारी सुरु केली आहे.

                        * जाहिरात*



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा