*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*
----- : गिरवी (ता. इंदापूर) येथे प्रगतशील शेतकरी संतोष क्षिरसागर व कुटूंबियांच्या वतीने ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. मागील पाच वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम यंदाही आनंदमय वातावरणात पार पडला.
या उपक्रमांतर्गत ऊसतोड मजुरांना प्रत्येकी पाच किलो प्रमाणे चिवडा, चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे आदी पारंपरिक दिवाळी फराळाचे साहित्य देण्यात आले. मजुरांनी फराळ स्वीकारत समाधान व्यक्त केले.
संतोष क्षिरसागर म्हणाले, “ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद फुलवणे हेच आमचे ध्येय आहे. त्यांच्यामुळेच शेती आणि उद्योग चालतो,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास ग्रामस्थ, ऊसतोड कामगार व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
फोटो : गिरवी येथे प्रगतशील शेतकरी संतोष क्षिरसागर यांच्या वतीने ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळाचे वाटप करताना.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा