अकलूज --प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
प्रस्थापितांची सत्ता विस्थापितानी उदवस्त केल्याचा इतिहास घडवण्याचे आवाहन
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने अकलूज नगरपरिषदेची निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली आहे,त्याच पार्श्वभूमीवरती अकलूज शहरातील पक्षाच्या सर्व शाखेतील अध्यक्ष व कार्यकर्ते यांचा मेळावा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आला होता.मेळाव्याला महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याच्या कार्यक्रमाला अकलूज शहरातील महिला सेनेच्या कार्यकर्त्या व ग्रामस्थांची उपस्थितीत मोठ्या संख्येने होती.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने मेळावा घेत अकलूज मध्ये शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांना बोलवून शक्तिप्रदर्शन केले आहे..
मेळाव्यामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून अकलूज शहरांमध्ये असलेल्या समस्या मांडण्यात आल्या,त्यावर उपाययोजना करण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली असल्याने शाखा अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी सर्व स्तरावर जाऊन कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिले.तसेच अकलूजमध्ये असलेली प्रस्थापियांची सत्ता विस्थापित लोकांनी उदवस्त करावी आणि इतिहास घडवावा असे आवाहन साठे यांनी केले.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या भूमिकेने अकलूज नगरपरिषद निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या भूमिकेचा फटका कोणत्या पक्षाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा