कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर --8378081147
बावडा लुमेवाडी जिल्हा परिषद गटातील पुरूष व महिला अशा १५१ नागरिकांना मोफत अजमेर शरीफ दर्शन यात्रेला पाठवण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब कोकाटे मित्र परीवाराच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या धार्मिक श्रद्धेचा आणि ऐक्यभावाचा प्रत्यय देणारी मोफत अजमेर शरीफ दर्शन यात्रेची सुरुवात बावडा लुमेवाडी जिल्हा परिषद गटातून मोठ्या उत्साहात करण्यात आली. या यात्रेत सराटी, पिंपरी बुद्रुक, लुमेवाडी तसेच परिसरातील गावांतील १५१ भाविकांनी सहभाग घेतला.
यात्रेची सुरुवात लुमेवाडी येथील हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करून सामूहिक प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर यात्रेकरूंचा ताफा सजविलेल्या लग्जरी बसमधून जयघोष करत अजमेरकडे रवाना झाला. प्रवासादरम्यान भाविकांनी "ख्वाजा गरीब नवाज बाबांचा जयघोष" आणि "हिंदु-मुस्लिम एकता जिंदाबाद" अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
अजमेर शरीफ दरगाह येथे पोहोचल्यावर भाविकांनी दरगाहमध्ये गावातील सर्व नागरिकांच्या सुख, शांती, ऐक्य आणि प्रगतीसाठी दुआ करणार असल्याचे बोलताना सांगितले.
मोफत अजमेर शरीफ दर्शन यात्रेचे यशस्वी आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे व मित्र परीवार यांच्यावतीने केले आहे. त्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक, युवक मंडळ व स्वयंसेवी संस्था यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यात्रेकरूंच्या सोयीसाठी वाहतूक, भोजन, निवास व वैद्यकीय सुविधा यांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, "अशा यात्रांमुळे समाजात बंधुभाव, सौहार्द आणि श्रद्धेची भावना दृढ होते." यात्रेकरू गावात परतल्यानंतर दरगाहमधून आणलेले तबर्रुक (प्रसाद) सर्व ग्रामस्थांना वाटण्यात येईल. यात्रेने पुन्हा एकदा एकतेचा आणि श्रद्धेचा सुगंध पसरवला असून, भाविकांचा उत्साह आणि भक्तिभाव दीर्घकाळ लक्षात राहील असा अनुभव सर्वांना आला.
फोटो - सराटी येथे मोफत अजमेर शरीफ दर्शन यात्रेला बसमधून निघालेले यात्रेकरू.
-----------------------------------------------------------------------








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा