Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

आवाटी येथील प्राचार्य डॉक्टर जिया खलील खान यांना पीएचडी पदवी प्रदान

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



करमाळा तालुक्यातील आवाटी येथील तसेच सध्या सातारा येथील छाबडा फार्मसी कॉलेज येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर जिया खलील खान यांनी नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त केली आहे डॉक्टर खान यांनी सरदार पटेल युनिव्हर्सिटी मध्यप्रदेश येथे फार्मसी विषयांमध्ये पीएचडी डिग्री संपादन करून सदरचे यश मिळवले आहे मूळचे आवाटी येथील असणारे तसेच करमाळा एसटी आगारातील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक कैलासवासी खलील समशेर खान यांचे चिरंजीव तसेच मा.सरपंच साबीर खान व करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील कला शिक्षक रफिक खान यांचे बंधू डॉक्टर जिया खान यांनी अथक परिश्रमातून सदरची पदवी प्राप्त केली आहे

सध्या सातारा येथील छाबडा फार्मसी कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर खान यांचे प्राथमिक शिक्षण आवाटी येथे तर माध्यमिक शिक्षण सुलाखे हायस्कूल बार्शी तर महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे झाले आहे तसेच डी फार्मसी व एम फार्मसी शिक्षण कराड येथे केले आहे त्यांनी सदरचे शिक्षण अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मिळवीत त्यांनी सदरची पीएचडी डिग्री प्राप्त केली आहे 

त्यांच्या या यशाबद्दल माजी आमदार जयंतराव जगताप आमदार नारायण आबा पाटील, तसेच माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, युवा नेते शंभूराजे जगताप, वली बाबा यांचे खादीम गुलाम नबी कादरी, इरफान कादरी, हसनैन कादरी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नसरुल्ला खान यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा