Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

*अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत १५१ उमेदवारांचे अर्ज दाखल तर नगराध्यक्ष पदासाठी ७ अर्ज दाखल.*

 ज्येष्ठ पत्रकार-- संजय लोहकरे

टाइम्स 45 न्यूज मराठी




आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अकलूज ग्रामपंचायतीला संबोधले जात होते.पुर्वीच्या काळी अकलूज हे गांव आठ वाड्यावस्तीचे गांव होते.कालांतराने लोकसंख्या वाढू लागल्या वाड्यावस्तीवर ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली.त्यामुळे अकलूज गावात एकमेव ग्रामपंचायत राहिली.

              अकलूज ग्रामपंचायतीची स्थापन स्वतंत्र पुर्व काळात सन १९२२ साली होती.लोकसंख्या वाढू लागल्यामुळे ग्रामपंचायतीला विकास कामाला निधी कमी पडू लागल्यामुळे संपुर्ण अकलूजकरांनी प्रांत कार्यालयाला समोर सलग ४३ दिवस उपोषण केल्यानंतर ९९ वर्ष अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायतीचे रूपांतर अकलूज नगरपरिषदेत झाले.त्या नंतर तीन ते चार वर्ष नगरपरिषदेची निवडणूक न झाल्यामुळे प्रशासकीय अधिकारी अकलूज नगरपरिषदेचा कारभार पहात होते.

             आज अकलूज नगरपरिषद निवडणूकीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.त्यामुळे विविध राजकीय पक्षातील उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात गर्दी केली होती.आज शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गट,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गट,महाराष्ट्र विकास सेना पक्ष व अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया संध्याकाळ पर्यंत सुरू होती.यामध्ये १५१ उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले आहेत व नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

त्यामध्ये सुवर्णा साठे (महाराष्ट्र विकास सेना),उषा कांबळे (वंचित बहुजन आघाडी),पुजा कोतमीरे (भारतीय जनता पक्ष),रेश्मा आडगळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट),दिव्यांनी रास्ते (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट),प्रतिभा गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट),उमा गायकवाड (वंचित बहुजन आघाडी) यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.उदया सर्व अर्जांची छाननी होणार आहे तर दि.१९ ते २१ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आहे.दि.२२ ते २५ नोव्हेंबर न्यायालयीन काही प्रकरण प्रलंबित त्यासाठी आहे.दि.२६ नोव्हेंबरला निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे व दि.२७ नोव्हेंबर पासून प्रचाराला प्रारंभ होणार आहे.दि.२ डिसेंबरला मतदान  होणार असून दि.३ डिसेंबरला मतमोजणी होवून निकाल घोषित करण्यात येणार आहे.

चौकट

अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या वेळी मोहिते-पाटील समर्थक व राम सातपुते समर्थक यांच्यात नगरपरिषदेच्या समोर घोषणाबाजी चालू होती.त्यामुळे काही काळ वातावरण तंग होते पण अकलूज पोलीस स्टेशनच्या चोख बंदोबस्तामुळे वातावरण काही वेळातच शांत झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा