सहसंपादक --संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
इंदापूर नगरपरिषद पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आमदार सचिन अहिर यांच्या सुचनेनुसार इंदापूर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्थानिक कृष्णा भीमा आघाडीला आपला जाहिर पाठिंबा दिला.
शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली. या परिषदेस उबाठाचे इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे, शहर प्रमुख महादेव सोमवंशी, जेष्ठ शिवसैनिक विशाल बोंद्रे,भिमराव भोसले, कृष्णा-भिमा आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कृष्णा-भिमा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्रदीप गारटकर म्हणाले, सन २००४ साली मी शिवसेना पक्षात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. मला पक्षाने इंदापूर विधानसभेसाठी उमेदवारी दिली होती. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते. शिवसेना पक्ष हा लढवय्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा पक्ष आहे. मी माझ्या राजकीय कार्यकीर्दीत ज्या ज्या पक्षात होतो, तिथे प्रामाणिकपणे काम केले आहे. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत निष्ठावंत, सर्वसामान्य कार्यकर्त्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने मिळावी अशी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून माझी प्रामाणिक इच्छा होती. परंतु पक्षश्रेष्ठी, तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला पैसेवाला उमेदवार पाहिजे असे सांगून कॅबिनेट मंत्र्यांनी पैसेवाल्या पुढे लोटांगण घातले. त्यामुळे आपण जिल्हाध्यक्ष पदाचा थेट राजीनामा देऊन सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे श्री. गारटकर यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे हिच खरी शिवसेना असून त्यांनी देखील कृष्णा -भिमा आघाडीला पाठिंबा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाने देखील आपल्या आघाडीला पाठिंबा असून आता तालुक्यातील उरलेले बाकीचे आघाडीबरोबर येतील असा सुतोवाच पाटील यांनी केला. श्री. गारटकर हे निवडणुकीस सर्वसामान्य कार्यकर्त्यास उभे करू म्हणत होते मात्र आम्ही त्यांचे मन वळवून त्यांना नगराध्यक्ष पदासाठी उभे केले असून त्यांचा व पॅनेलचा विजय निश्चित आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा