*सहसंपादक- डॉ-संदेश शहा इंदापूर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9922419159*
इंदापूर तालुक्यातील रेडा गावातील पवार कुटुंबातील तिसऱ्या युवा पिढीने चार दशका पासून जोपासली शेकडो वर्षाची वारकरी परंपरा - ह. भ. प. रावसाहेब शिपलकर महाराज.
कोल्हापुरी फेटे, चहा पाणी, फटाक्याची आतषबाजीने वारकऱ्यांचे मोठ्या दिमाखात झाले स्वागत, वारकऱ्यांनी केला राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल चा गजर !
श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याने अहिल्यादेवी नगर जिल्हा श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथून कार्तिक शुद्ध-३ शुक्रवार दि.२४ ऑक्टोबर २०२५ रोजी पंढरपूरकडे राम कृष्ण हरी, ग्यानबा तुकाराम च्या जयघोषात कार्तिकी वारीसाठी प्रस्थान केले. दि.२८ ऑक्टोबर रोजी रेडा ( ता. इंदापूर जिल्हा पुणे ) या गावात श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे तोफांची सलामी तसेच फटाक्याच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. येथील पवार कुटुंबाचे प्रमुख तथा माजी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव पवार यांनी दिंडी सोहळ्याचे प्रमुख व सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. महिलांनी तुळशी पूजन करून दिंडी सोहळ्यातील महिलांचे स्वागत केले. श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे हे ४८ वे वर्ष असून रेडा गावातील पवार कुटुंब हे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर कडे जाणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचे परंपरेप्रमाणे स्वागत करतात. पवार कुटुंबातील तिसऱ्या युवा पिढीने गेली चार दशक कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर कडे जाणाऱ्या श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे स्वागत व सेवा करण्याची परंपरा संवर्धित केली आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना कोल्हापुरी फेटे बांधत तसेच चहापाणी, फटाक्याची आतिषबाजी करत त्यांनी सर्वांचे स्वागत केले. दिंडी सोहळ्या तील महिला व मानाचे मानकरी यांना कोल्हापुरी फेटे बांधून श्री. पवार कुटुंबाने स्वागत केल्याने महिला मंडळींच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता.
आषाढी वारी, कार्तिकी वारीसाठी लाखो वारकरी मंडळी पंढरपूरकडे विठ्ठल दर्शनाची आस घेऊन अक्षरशा ऊन, वारा, पाऊस, संसाराची तमा न करता, देहभान हरपून पंढरपूरकडे जात असतात.
गुरुवर्य निवृत्ती ( आण्णा ) शिपलकर, वै. गुणाईमाता निवृत्ती शिपलकर यांच्या प्रेरणेने हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे पायी वारी गेली ४८ वर्ष करत आहे. त्यामध्ये ह. भ. प. दत्तात्रय महाराज शिपलकर, सोमनाथ महाराज शिपलकर, रावसाहेब शिपलकर ( गुरूजी ), भानुदास दातीर महाराज, हरी घोडके, विणेकरी कुमार काका कुलकर्णी, चोपदार हनुमंत नारायण शिपलकर, संजय कुदळे, बाळासाहेब ढोके, वामन रांहीज, भीमसेन खरात, बाळासाहेब लगड, कैलास देशमुख, प्रकाश परकाळे, बाळासाहेब ढोके, मंगल मोटे, सुरेखा जठार, वनिता गिरमकर, सविता पवार, स्पीकर व्यवस्था संजय पवार आदी वारकरी मंडळींनी वारीतील अनुभव कथन केले.
त्याचप्रमाणे ह.भ.प. बबन पवार महाराज (ट्रेलर), बाळासाहेब नागवडे यांनी बहारदार भारुडाचा आणि भजनाचा कार्यक्रम सादर केला. विठ्ठलाच्या चरणी एवढीच आम्ही प्रार्थना करतो की, शेतकरी आणि सर्व सामान्यांना सुख, समाधान शांती लाभू दे, आणि जन्मोजन्मी आमच्या घराण्याकडून वैष्णव सेवा घडू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करत पवार कुटुंबाकडून यावेळी भावना व्यक्त करण्यात आल्या. श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळा हा पवार कुटुंबाच्या पाहुणचार घेतल्यानंतर रेडा गावातील जालिंदर देवकर यांच्या निवासस्थानी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.
श्री क्षेत्र दिंडी सोहळ्याचे ह.भ.प. रावसाहेब शिपलकर ( गुरुजी ) म्हणाले,श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर कौठा पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे हे ४८ वर्ष श्री. पवार कुटुंब गेली ४० वर्षापासून सेवा करत आहेत. हा उपक्रम आदर्श व स्तुत्य आहे. पंढरपूर मध्ये दिंडी सोहळा पोहोचल्यानंतर चार दिवस संतराज मठ पंढरपूर येथे मुक्काम राहणार असून नगर प्रदक्षिणा, गोपाळ काला करून पुन्हा दिंडी सोहळा कौठा श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर कडे परतीचा प्रवास सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प. दत्तात्रय शिपलकर महाराज म्हणाले, रेडा गावातील पवार परिवाराचे प्रमुख सुखदेव पवार आणि त्यांचे पुत्र पत्रकार कैलास पवार हे दिंडी सोहळ्याचे अतिशय मोठ्या उत्साहात स्वागत करतात. त्यामुळे सर्वांचा आध्यात्मिक आनंद ओसंडून वाहतो.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा