Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

*इंदापूर महाविद्यालय विज्ञान शाखेचे सन 2003 साल च्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्या द्वारे एकत्र येऊन केली महाविद्यालय व गुरुजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त*

 *सहसंपादक- डॉ-संदेश शहा इंदापूर*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो:-- 9922419159*

इंदापूर महाविद्यालय विज्ञान शाखेच्या   सन २००३ साल च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २२ वर्षा नंतर स्नेहमेळाव्याव्दारे   एकत्र येऊन केली महाविद्यालय व गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त, यावेळी मेळाव्यात दिल्या जुन्या आठवणींना उजाळा.


इंदापूर महाविद्यालय विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा २२ वर्षानंतर स्नेहमेळावा इंदापूर येथील डॉ. नि. तू मांडके सभागृहात संपन्न झाला. यावेळी गुरुजन तसेच महाविद्यालयाप्रती विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करून जुन्या आठवणींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली. सुमारे २२ वर्षांनंतर २००३ मध्ये विज्ञान शाखा तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे होते तर प्रा. डॉ. जयश्री गटकुळ,प्रा.बी.डी.काळे,प्रा.यू.एल.माने, डॉ. शिवाजी वीर, डॉ. आर.आर.भोसले हे गुरुजन यावेळी उपस्थित होते.

पांडुरंग कुंभार,अश्विनी दीक्षित, सचिन अरणे, नितीन झिंजडे,नवनाथ नरुटे, नितीन सूर्यवंशी, विकास खटके, संतोष कदम,अंकुश पवार, बाबासाहेब वायाळ, संतोष कदम, रोहिणी माने यांनी पाहुण्याचे स्वागत केले. सचिन फलफले, नितीन गोरे यांनी स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन केले.

 २२ वर्षांच्या दीर्घ काळानंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी मैत्रीतले ते हसरे क्षण, मंतरलेले दिवस व अनुभव आठवणींद्वारे पुन्हा जिवंत केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांना पुस्तके प्रदान करण्यात आली. आपल्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती, कॉर्पोरेट क्षेत्र, शासकीय सेवा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात असणारे त्यांचे योगदान पाहून प्राध्यापकांनी देखील समाधान व्यक्त केले.        

                        *जाहिरात*



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा