*अकलूज ---प्रतिनिधी*
*केदार लोहोकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
महाराष्ट्र राज्य लोकसेवा मार्फत समर्थ राकले यांची वर्ग-१ श्रेणीतील पदासाठी समर्थ संजय राकले यांची निवड झाली आहे.माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती कै.श्रीनिवास विठ्ठल राकले यांचे नातू व अकलूज येथील सुप्रसिद्ध उद्योजक संजय राकले व सुप्रसिद्ध वकील विजयालक्ष्मी राकले त्यांचे सुपुत्र समर्थ संजय राकले आहेत.
त्यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मुंबई यांच्यातर्फे वर्ग-१ (क्लास वन) श्रेणीतील पदासाठी गुणवत्तेनुसार निवड झाली आहे. एमपीएससी स्पर्धा परीक्षेत ते त्यांच्या संवर्गातून गुणवत्तेनुसार महाराष्ट्र राज्यात गुणवत्तेनुसार तिसरे आले आहेत. त्यामुळे ते आता उपजिल्हाधिकारी,सहाय्यक आयुक्त,मुख्याधिकारी नगरपालिका, नगरपरिषद,पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त,सहाय्यक राज्यकर आयुक्त,गटविकास अधिकारी,सहाय्यक कामगार आयुक्त तसेच शासनाच्या इतर विभागातील समकक्ष पदावर नियुक्तीस पात्र झाले आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,जयसिंह मोहिते-पाटील,मदनसिंह मोहिते- पाटील,आ.रणजितसिंह मोहिते- पाटील,खा.धैर्यशील मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील व संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीयांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.त्यांचे यशाबद्दल अकलूज व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मार्गदर्शन करणारे व प्रोत्साहन देणारे शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ.आबासाहेब देशमुख व त्यांच्या पत्नी सौ.सुनीता देशमुख यांनी समर्थ संजय राकले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला व कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल "समर्थ राकले "यांना --
टाइम्स 45 न्यूज मराठी --व समुहाच्या वतीने 'हर्दिक शुभेच्छा 🎉🌹.
*जाहिरात*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा