संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या भीषण स्फोटाचा तीव्र निषेध करण्यात आला. या दुर्दैवी घटनेत निर्दोष नागरिकांचा बळी गेल्याने शोक व्यक्त करत चार हुतात्मा चौक, सोलापूर येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मेणबत्त्या पेटवून अभिवादन करून मौन पाळण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत देशाच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या भीषण स्फोटात अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे. देशाची राजधानी हादरवणारा हा हल्ला म्हणजे मोदी सरकारच्या अपयशाचं जिवंत उदाहरण आहे. ज्या लाल किल्यावरून दरवर्षी पंतप्रधान तिरंगा फडकवतात, तिथेच निरपराध नागरिकांचा सिंदूर पुसला गेला. देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी दिली.
पुढे बोलताना चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, राजधानीत नागरिकांचा जीव घेतला असताना नागरिकांना धीर द्यायचे सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या राजाच्या वाढदिवस कार्यक्रमात मग्न आहेत. देशातील नागरिकांवर दहशतवादी हल्ले होत असताना मोदी आणि अमित शहा मात्र सांगतात की ‘देश सुरक्षित हातात आहे’. पण वास्तव हे आहे की हल्लेखोर देशात येतात, नागरिकांना मारतात आणि सुरक्षितपणे निघून जातात. मग या सरकारला सुरक्षा व्यवस्था कोठे दिसते आहे? देशाच्या सुरक्षेची जबाबदारी हे गृह मंत्रालयाचे आणि पर्यायाने गृहमंत्र्यांचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. परंतु दिल्लीसारख्या संवेदनशील ठिकाणी, तेही लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाने गृह मंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
पंतप्रधान मोदींनी २०१६ च्या नोटबंदीच्या वेळी दावा केला होता की दहशतवादाचे कंबरडे मोडले आहे. मात्र त्यानंतर उरी, कारगिल, पठाणकोट, संसद, अक्षरधाम, पुलवामा, पहलगाम, अमरनाथ अशा अनेक हल्ल्यांनी देश हादरला. पुलवामा आणि पहलगाममधील हल्लेखोर आजतागायत सापडलेले नाहीत. मग नोटबंदीचा आणि दहशतवाद निर्मूलनाचा दावा कुठे गेला? देशातील नागरिक सतत असुरक्षित वातावरणात जगत आहेत. स्फोट, हल्ले, हिंसाचार सुरूच आहेत आणि सत्ताधारी मात्र सडकछाप भाषणे देत आहेत. निवडणूक प्रचाराशिवाय मोदी-शहा यांना देशाच्या सुरक्षेची फिकीर नाही, हेच या घटनेतून स्पष्ट झाले आहे,” असेही चेतनभाऊ नरोटे म्हणाले.
त्यांनी हल्ल्यात बळी गेलेल्या सर्व नागरिकांबद्दल दुःख व्यक्त करत शोकाकुल कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण केली आणि केंद्र सरकारकडून सखोल, निष्पक्ष आणि तत्काळ चौकशीची मागणी केली.
यावेळी प्रदेश सचिव मा. नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी, प्रदेश सचिव राहुल वर्धा, श्रीशैल रणधिरे, प्रा नरसिंह आसादे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, भटक्या विमुक्त विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मागासवर्गीय विभाग जिल्हाध्यक्ष अँड मयूर खरात, सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर, माजी नगरसेवक मधुकर अठवले, हारुण शेख, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, सिद्धाराम चाकोते, अशोक कलशेट्टी, अनिल मस्के, रॉकी बंगाळे, गिरीधर थोरात, कोमारो सय्यद, शोऐब महागामी, लखन गायकवाड, अनिल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, शिवशंकर आंजनाळकर, संजय गायकवाड, सागर उबाळे, सागर शहा, दीनानाथ शेळके, सुभाष वाघमारे, नूरअहमद नालवार, परशुराम सतारेवाले, एजाज बागवान, भीमराव शिंदे, ईरफान शेख, राजेश झंपले , माजी महिला अध्यक्ष अँड करीमुन्नीसा बागवान, सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, शुभांगी लिंगराज, संघमित्रा चौधरी, चंद्रकांत टिक्के, संजय कुराडे, सरफराज नदाफ, शुभम काळे, आबा मेटकरी, सुभाष सलगर, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, रेखा बिनेकर, निशा मरोड, सुनिता बेरा, अनिता भालेराव, चंद्रकला निजमल्लू, शिवाजी साळुंखे, चंदू नाईक, नागनाथ शावणे, बनप्पा कंपली, अभिलाष अच्युगटला, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा