Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

शेलारपट्टा पळसदेव येथे मोफत हरबरा बियाणांचे वाटप

 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*





-पळसदेव तालुका इंदापूर येथील मौजे शेलारपट्टा येथे शेतकरी बचत गटाला मोफत हरबरा बियाणे वाटप करण्यात आले . या वेळी मंडल कृषी अधिकारी किरण पिसाळ यांनी हरबरा पीक बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . 

       मौजे शेलारपट्टा येथे कृषी विभागाच्या वतीने  तालुका कृषी अधिकारी इंदापूर  दिपक गरगडे  यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत हरबरा बियाणे वाटप व हरबरा शेती शाळा आयोजित केली होती . या वेळी किरण पिसाळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हरबरा  बियाणे निवड ,बीज प्रक्रिया ,जमिनीची पूर्व मशागत कामे , पेरणी करताना घ्यावयाची काळजी  या बाबत मार्गदर्शन केले .व पुढील चार महिन्यात हरबरा पीक बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी एकूण ४ प्रशिक्षण वर्ग होणार  असल्याची माहिती दिली . 


      या वेळी शेतकरी नोंदणी,.ओळख ,महाविस्तार एआय ॲप  बाबत  सहायक कृषी अधिकारी गणपत खांडेकर मार्गदर्शन केले. महाविस्तार एआय ॲप  चा कसा वापर करायचा या बाबत प्रात्येक्षित दाखवण्यात आले . व शेतकऱ्यांनी या ॲप  चा अधिकाधिक वापर करून शेतात चांगले उत्पन्न काढणायचा प्रयत्न करावा असे आवाहन या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी केले . 

         या  वेळी मंडळ कृषी अधिकारी किरण पिसाळ ,उप कृषी अधिकारी गोपाळ खंडागळे , सहायक कृषी अधिकारी गणपत खांडेकर , प्रशांत मोहोळकर , योगेश बोगाने  सह शेतकरी बबन बनसुडे , सोमनाथ शिंदे , रमेश पवार ,दिपक शेलार ,सतीश शिंदे , अमर इंजे , विकास जावळे , संपत गांधले ,प्रमोद शेलार  , हनुमंत जावळे ,नवनाथ इंजे , महेंद्र घाडगे ,रविराज देटे  शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्र संचालन रामदास पवार यांनी तर आभार प्रशांत मोहोळकर यांनी मानले . 

फोटो - शेलारपट्टा पळसदेव येथे मोफत हरबरा बियाणे वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा